Sunday, October 27, 2013

America trip.....2013.



   2010....... अमेरिका ट्रीप ......15 दिवसांची.....मजा खूप केलीच ....पण डोक्यात शाळा असायचीच .2013...   अमेरिका ट्रिप .....30 दिवसांची......मी निवृत्त.....त्यामुळे जास्त मजा आली .
      या वेळी 2 ट्रिप्स केल्या .
     एक Zion National park ची .......simply wonderful......
     utah च्या southwest भागात जवळ जवळ ६०० किमी  मधे पसरलेले हे भव्य दिव्य असे park म्हणजे
    ख़रोखर  एक भौगोलिक  चमत्कारच म्हणायला हवा.
     Basically sandstone चे बनलेले प्रचंड मोठे पर्वत आपले विविध रंग घेवुन जेव्हा समोर आले
   तेंवा   मला काही सूचेचना ......नुसती बघतच राहिले.......अगदी भारावून.
    sedimentation म्हणजे नक्की काय हे मुलाना दाखवायला हव.
   पुस्तकातली चित्र आणि वास्तव ....कल्पनाच येत नाहि ....मलासुद्धा नवती .
    तरी सरकार बंद असल्यामुले पार्क बंद होते ,पण national highway पार्क मधून ज़ात असल्याने
   काही भाग बघ ता आला......पुन्हा एकदा यायलाहव ......
   सरकार बंद ...........हा एक नविनच अनुभव होता ......obama यांच्या पब्लिक हेल्थ च्या
  निर्णयाविरुध्ध रिपब्लिकन  पक्षाने आवाज उठवला ........obama ठाम ...सरकार  १६ दिवस बंद .....
  सगळ इतक सहज ......अगदी शांततेत......अस कस होवू शकत ? मोर्चे नाही ,एकमेकांवर  चिखलफेक   नाही ,
 निदान सर्वसामान्य लोकांचे जीवन तरी अगदी शांततेत सुरु होते .देश प्रचंड मोठा ,लोकसंख्येची घनता खूप कमी
 हे वास्तव मान्य केले तरी समाजाचा विचारांचा स्तर असा कसा घडला असेल ?
 दूसरी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पब्लिक प्लेसेस मधे सिगरेटचे प्रमाण कमी ....तसेच
 self unemployment चे प्रमाण ही कमी .......प्रत्येक माणुस आपल्या कामाकडे आदराने बघणार
आणि समाजही  त्यांना  आदराने  वागवणार .
सई आणि साकेत च्या घराबाहेर फिरायला जाताना रस्त्यावर अनेक गुलाबांचे ताटवे च्या ताटवे फुललेले ....
अगदी आपल्या देशी गुलाबांसारखे .......पण कोणीही एका पाकळीला सुद्धा हात लावत नवते ......अस
कस घडू शकत ?
काही ठराविक भाग सोडला तर बाकी सगळा भाग अगदी स्वच्छ ... शिस्त/, तर आता सगळ्यांना सगळ्या
 कथा माहितच आहेत... हे सगळ यांना कोठून ,कधी आणि कस मिळाल ?भारतीय लोकही इथे अगदी शिस्तीत वागतात ,स्वच्छता पाळतात ,मग भारतात हे सगळ का घडत नाही ,काय आणि कुठे चुकत ?
बदल घडवण्यासाठी कशी आणि कुठून सुरवात करावी लागेल ?
देशापेक्षा नेते आणि राजकारण मोठे हे समीकरण कधी आणि कस बदलेल ?फक्त मतदान करून मी
बदल घडवण्यात हातभार लावू शकते का ?
थोडा इतिहास बघितला तर अनेक देश आपल्या पेक्षाही वाईट परिस्थितीत होते ,त्यांनी हा प्रवास कसा
केला असेल ?उदा . सिंगापूर ,कोरिया .....
शिक्षक आणि पालक एकत्र येवून बदलांना सामोर जाता येण शक्य आहे का ?
महिनाभरात अनेक लोक भेटले ,ओळखी आणि अनोळखी . इथे राहिलेले ओळखीचे लोक उगीचच्या
चौकशा करत नवते .... चांगल वाटल ....... आपलेपणा दाखवण्यासाठी ते गरजेचे नाही खरतर .......
अनोळखी लोक सहजपणे विश करत होते .
प्रश्नच प्रश्न .... खटकणाऱ्या गोष्टी ही दिसल्या नाही अस नाही ,पण आपण चांगल्याच गोष्टी
बघाव्यात नाही का ?

Sunday, January 3, 2010

माझी अमेरिकेची यात्रा

साध्य मी माझ्या मुलीकडे बोस्टन गावी आली आहे. आम्ही खूप मज्जा केली. IMAX चा चित्रपट काल आम्ही बघितला. अवतार नावाचा एक अप्रतीम इंग्रजी सिनेमा बघितला. 3D चे स्पेशल एफ्फेक्ट्स फारच सुन्दर तयार केले आहेत.